लसूण सोलण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. अगदी सहजसोप्या पद्धतीने लसूण सोलण्यासाठी प्रत्येक जण वेगळी ट्रिक वापरतो. पण तुम्ही कधी वॉशिंग मशीनमध्ये लसूण सोलून पाहिला आहे का? एका गृहिणीने हा जबरदस्त जुगाड दाखवला आहे.
तुम्हाला जितकी लसूण लागणार आहे तितकी लसूण घ्या. लसणीच्या पाकळ्या वेगळ्या करा आणि ही लसूण 15-20 मिनिटं थंड पाण्यात टाकून ठेवा. आता कॉटन बॅग किंवा सुती कापड घ्या. त्यात भिजवलेला लसूण ठेवून त्यात गुंडाळून घ्या. आता लसूण गुंडाळलेलं हे कापड वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये टाका. झाकण लावून 2 ते 5 सेकंद फिरवून घ्या.
आता वॉशिंग मशीनमधील लसूण ठेवलेलं कापड बाहेर काढा आणि उघडून पाहा. लसणीच्या साली निघालेल्या दिसतील. पण तरी त्यातील एक एक लसूण निवडून काढणंही शक्य नाही. त्यामुळे पुन्हा ही लसूण सालीसह पाण्यात टाका. साली हलक्या असल्याने त्या पाण्याच्या वर तरंगतील तर लसूण पाण्याच्या तळाशी राहिल.