मकरसंक्रात आता काही दिवसांवर आली आहे. सर्वजण मकरसंक्रांतीच्या दिवशी आकाशात पतंग उडवतात. पतंग उडवण्याच्या मोठ्या स्पर्धाच रंगतात. आता पतंग उडवायची म्हटल्यावर एका व्यक्तीला धाग्याची फिरकी धरून उभं रहावं लागतं. सहसा मुलं पतंग उडवताना मुलींना फिरकी धरून उभं करतात. त्यामुळे एका दुकानदाराने यावर देसी जुगाड शोधला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पतंगीच्या फिरकीला या व्यक्तीने एक बटन बसवलं आहे. हे बटन दाबल्यावर धाग्याला ढिल मिळते आणि धागा टाइट देखील होतो. पतंग हवेत उडत असताना तीलायोग्य वेळी ढील मिळणे गरजेची असते. फिरकी फिरवणाऱ्या व्यक्तीचं गणित बिघडलं की पतंग खाली कोसळते.
अनेकदा यावरून पतंग उडवणारा आणि फिरकी पकडणारा या दोघांमध्ये वादही होतात. तसेच पतंग उडवण्याचा खेळ प्रत्येकाला मनसोक्त खेळता यावा म्हणून या व्यक्तीने हा देसी जुगाड शोधून काढला आहे. फिरकीच्या आतमध्ये एक मशिन बसवण्यात आलं आहे. त्यावरच ही फिरकी बटनाच्या सहाय्याने गरगर फिरत आहे.
Video:पतंग उडवताना फिरकी पकडण्याची चिंता मिटली; दुकानदारानं शोधला देसी जुगाड
- Advertisement -