गेल्या काही वर्षांपासून भेसळयुक्त अन्नाचे प्रमाण वाढताना दिसतेय, अगदी दुधापासून ते तांदळापर्यंत आपल्याला अनेक गोष्टीत भेसळ पाहायला मिळते .असे भेसळयुक्त पदार्थांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आज काल अनेक कंपन्या फसव्या जाहिराती करतात. यामुळे अनेक प्रयत्न करुनही काहीवेळा बनावट वस्तू कोणती आणि खरी कोणती यातील फरक ओळखणे कठीण होऊन बसते. अशा बनावट वस्तू बनवण्यात चीनशी कोणी स्पर्धा करु शकत नाही. तसं पाहिलं तर रोज वापरात असलेल्या गोष्टींपासून ते खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये भेसळ करून बनावट वस्तू बनवण्यात चीनचा हात कोणी पकडू शकत नाही. नुकताच व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुम्हाला याची कल्पना येऊ शकते, ज्यामध्ये एक व्यक्ती भाजीच्या दुकानात विकल्या जाणाऱ्या चायना बनावटीच्या लसूणबद्दल लोकांना जागरुक करताना दिसत आहे.
तुम्हाला माहित असेल तर, बाजारात विकला जाणारा हा बनावट लसूण आज भारतातील अनेक घरांमध्ये रोज विविध भाज्या आणि पदार्थांमध्ये वापरला जात आहे. पण लोकांना तो लसूण बनावट आहे हे अजूनही माहिती नाही. वरुन पांढरे शुभ्र दिसणारे हे बनावट लसूण ओळखणे तितकेसे अवघड काम नाही. पण या लसणाची लागवड कशी केली जाते हे जर तुम्हाला कळले तर तुम्हीही नक्कीच डोक्याला हात माराल, व्हिडिओमध्ये एक व्यक्ती या बनावट लसूणबद्दल सांगताना म्हणते की, हे बनावट लसूण अशा प्रकारे बनवले जातात की तुम्ही काहीही विचार न करता ते लगेच खरेदी कराल. हे लसूण सोलणेही खूप सोपे आहे.
या लसणांच्या चवीबद्दल बोलायचे झाले, तर या बनावट लसणाची चव खऱ्या लसणासारखीच आहे, ज्यामध्ये फरक करणे थोडे कठीण आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती सांगत आहे की, हे बनावट लसूण तयार करण्याची पद्धत अतिशय धक्कादायक आहे. हे बनावट लसूण शिसे आणि इतर धातू वापरून लवकर तयार केला जात असल्याचा दावा व्हिडिओमध्ये केला जात आहे. इतकेच नाही तर ते क्लोरीनने ब्लीच केले जाते, जेणेकरून ते पांढरे राहते.
Video जेवणात चिनी बनावटीचा लसूण तर खात नाही ना?लसूण बनावट आहे की खरा हे ओळखण्यासाठी
- Advertisement -