Thursday, March 27, 2025

राज ठाकरेंचा यू टर्न… पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार

मनसेने अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. मात्र, भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेत भाजपला निवडणुकीसाठी ‘सशर्त’ पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्यामागे राज ठाकरे यांचे दूरगामी राजकीय गणित असल्याचा दावा नितीन सरदेसाई यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्याबाबत राज ठाकरे यांच्याशी बोलले. त्यावेळी अशा पद्धतीच्या गोष्टी वारंवार होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. आमचा पक्ष स्वतंत्र आहे, आम्हाला उमेदवार लढवता येत नाही, याबाबत राज ठाकरे यांनी फडणवीसांना सांगितले. त्यावर फडणवीसांनी असे वारंवार घडणार नाही, असे आश्वासन दिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles