Tuesday, April 23, 2024

पीएम मोदी दिसताच उद्धव ठाकरेंना घाम फुटला होता…. एकनाथ शिंदेंची कडवट टीका…

शिवसेना शिंदे गटाचे दोनदिवसीय महाअधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडले. महाअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप नेत्यांच्या अभिनंदनचे ठराव करण्यात आल्यानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाअधिवेशनेच्या समारोप प्रसंगी भाषण केलं.

वारसा सांगणाऱ्यांनी पहिल्यांदा आपला आरसा पहावा, बाळासाहेबांचा वारसा सांगायला तोंडात नव्हे तर मनगटात मेहनत असावी लागते. शिवसेनेसाठी घरावर तुळशीपत्र अनेक शिवसैनिकांकडून ठेवण्यात आले. हे आयत्या पिठावर रेगुट्या मारायला आले. मात्र, त्या सुद्धा त्यांना नीट मारता आल्या नाहीत, अशी सुद्धा टीका एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करताना आरोपांवर आरोप केले.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री एक उद्धव ठाकरे अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासमवेत पीएम मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये गेले होते. दिल्लीमध्ये पीएम मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांना घाम फुटला होता, असा दावाही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना केला. आपल्याला हा किस्सा अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितले ते म्हणाले.

उबाठा गटाकडून आम्हाला 50 कोटी मिळावे म्हणून पत्र पाठवण्यात आलं होतं. एका क्षणाच्या विचार न करता आम्ही ते देऊन टाकले. आमच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप करतात. अरे मनाचे नाही, तर जनाची तरी तुम्हाला लाज वाटायला हवी, अशी टीका शिंदे यांनी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles