Tuesday, May 28, 2024

मविआच्या उमेदवारास एकाच वेळी १७ माजी महापौर, २२० माजी नगरसेवकांचा पाठिंबा…

: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती रिंगणात आहेत. तर महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक आखाड्यात आहेत. ही लढत चुरशीची होणार असून आता शाहू महाराजांना 220 माजी नगरसेवक आणि 17 माजी महापौरांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

सर्व माजी नगरसेवक व महापौरांनी न्यू पॅलेस येथे झालेल्या मेळाव्यास उपस्थित राहून शाहू महाराजांचा प्रचार करण्याचा निर्धार केला. या मेळाव्याला काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील आदी नेते उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles