Monday, September 16, 2024

अजित पवार महायुतीत आल्याने भाजपला घरघर… फडणवीसांचा जवळचा शिलेदार ‘तुतारी’ फुंकणार!

कोल्हापूर जिल्ह्यातील बडे राजकारणी समरजीतसिंह घाटगे यांनी येत्या 23 ऑगस्टला कार्यकर्त्यंचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात समरजीत घाटगे आपला निर्णय जाहीर करु शकतात. मात्र, समरजीत घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास तो भाजपसाठी मोठा धक्का ठरेल.

मेळाव्यात समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतील, असे सांगितले जात आहे. प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मंगळवारी रात्री उशीरा तसे निरोप पाठवण्यात आले आहेत. याशिवाय, गुरुवारी कोल्हापुरात महायुतीची जाहीर सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार आहे. तरीही समरजीत घाटगे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.

समरजीत घाटगे हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती धरतील, असे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून समरजीत घाटगे हे शरद पवार गटात जातील, अशी चर्चा होती. आगामी विधानसभा निवडणुकीत ते तुतारीच्या चिन्हावर कागल मतदारसंघातून अजितदादा गटाच्या हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकतील, असा अंदाज आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles