Tuesday, April 23, 2024

शिवसेनेचे कोल्हापुरात फाईव्ह स्टार महाअधिवेशन, 100 हॉटल, 2 हजार खोल्यांचे बुकींग

शिवसेनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन कोल्हापुरमध्ये शुक्रवारपासून होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहे. मुख्यमंत्र्यांसह या अधिवेशासाठी नऊ मंत्री, 43 आमदार, 13 खासदार कोल्हापुरामध्ये येणार आहेत . अधिवेशनासाठी जिल्ह्यातील सुमारे 100 हून अधिक हॉटेलमधील दोन हजार खोल्यांचे बुकिंग शिवसेनेकडून करण्यात आले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः दोन दिवस कोल्हापुरात असणार आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाअधिवेशनाचे उद्‍घाटन होणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. अधिवेशनात तीन सत्र असतील. शनिवारी सायंकाळी गांधी मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. अधिवेशासाठी साधारण दोन हजारांहून पदाधिकारी सलग तीन दिवस कोल्हापुरात असतील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles