Sunday, July 21, 2024

सीईओ एस.कार्तिकेयन यांची संवेदनशीलता…रूजू होण्यास आलेल्या शिक्षकाला दिला मोठा आधार…

मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांची उदात्त संवेदनशीलता

कोल्हापूर/
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर समुपदेशन प्रक्रियेने शाळा घेण्यासाठी आलेल्या जुन्नर तालुक्यातील हरिभाऊ विरणक या शिक्षकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे पवित्र पोर्टल मधून शिक्षण सेवक पदी रुजू होण्यासाठी दाखल झालेला जुन्नर तालुक्यातील ‘हरिभाऊ विरनक’ नावाचे शिक्षक कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे नोकरीचे गाव घेण्यासाठी आले असताना पाठीमागे वडील गेल्याची दुःखद बातमी कानावरती येते.सार अवसान गळून पडतं..हयातभर काबाडकष्ट करून मूलग्याला शिक्षक झालेला बघण्याचं बापाचं स्वप्न मात्र अधुरच राहिलं.
समुपदेशन प्रक्रिया चालू असताना हा प्रसंग घडला..जिल्हा परिषद प्रशासन आणि उपस्थित सर्व नवनियुक्त शिक्षकाच काळीज हेलावून गेलं.
या प्रसंगांमध्ये जिल्हा परिषदेचे संवेदनशील मनाचे सीईओ एस. कार्तिकेयन यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ त्या शिक्षकाला जुन्नर तालुक्यातील त्याच्या गावाला जाण्यासाठी स्वतःच्या गाडीची सोय करून देतात. वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी स्वतःची गाडी पाठवून ‘अधिकारपणातील ही माणुसकीच्या ओलाव्याचे’ दर्शन घडवणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या निकोप,निखळ आणि निर्व्याज स्वभावाची संवेदनशीलता उपस्थितांनी अनुभवली.

हाती नोकरीची ऑर्डर, जीवनातील अत्यानंदाचा क्षण आणि नेमके त्याच वेळी मोबाईलवर मेसेज आला वडिलांचे मृत्यू झाल्याचा. मन सुन्न करणारी ही घटना. जुन्नर येथील हरिभाऊ दिगंबर विरणक या शिक्षकाला गुरुवारी एकाच वेळी हसू आणि आसू अशा स्थितीला सामोरे जावे लागले. वडिलांच्या मृत्यूने धक्का बसलेल्या त्या शिक्षकाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी आधार दिला. शिक्षकाचे सांत्वन केले आणि वडिलांच्या अंत्यदर्शनाला जाण्यासाठी स्वतःच्या वाहनाची सोय केली.

यापूर्वी झालेल्या समुपदेशन शिक्षक बदली प्रक्रियेत संपूर्ण जिल्ह्याने सीईओंच्या संवेदनशील,कर्तव्यदक्ष आणि माणुसकीच्या स्वभावाचे दर्शन घडले आहे. मुलाखतीवेळी सुद्धा परगावच्या उमेदवाराची निवासाची सोय करणारा हा अधिकारी विरळाच! याची देही याची डोळा हा प्रसंग पाहताना मुलाखतीसाठी आलेल्या उपस्थित शिक्षकांच्याही भावनांचा बांध फुटला आणि नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेमन एस यांनी दाखविलेली संवेदनशीलता, माणुसकी आणि तत्परता या साऱ्या गोष्टी मात्र उपस्थित शिक्षकांना मनापासून भावल्या.
म्हणून जिल्हा परिषदेचे तरुण,होतकरू,संवेदनशील मनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन हे कोल्हापूर जिल्हा परिषद कडे हजर झाल्यापासून समस्त जिल्हा प्रशासनाच्या कर्तव्यातील सचोटी आणि माणूसपणाच्या ओलाव्याचा निखळ झरा आहे अशाच भावना समस्त शिक्षकातून उमटल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles