राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर इतर काही मतदारसंघाप्रमाणेच कोपरगावमध्येही तेढ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच आशुतोष काळे यांनी उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे भाजप नेते विवेक कोल्हे यांची राजकीय अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता विवेक कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला एकामागे एक धक्के देत आहेत. आता शरद पवार नगर जिल्ह्यात भाजपला धक्का देणार का ? अशी जोरदार चर्चा रंगली आहे. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.