कोपरगाव तालुक्यात तहसील कार्यालयात लाखोंचा घोटाळा समोर आला आहे. मागील वर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत पर्यवेक्षकांना देय असलेल्या मानधन रक्कमेत कोपरगाव तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या संगनमताने तब्बल सहा लाख रुपयांचं बोगस बील काढून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी माहितीच्या अधिकार अंतर्गत मागितलेल्या माहितीद्वारे हा घोटाळा उघडकीस आला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.
कोपरगाव तहसील कार्यालयात लाखोंचा भ्रष्टाचार…कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा
- Advertisement -