Saturday, January 25, 2025

केडगाव-बायपास रस्त्यावर खुनी हल्ला ,आरोपींना कोतवाली पोलीसांनी केले काही तासातच जेरबंद

केडगाव-बायपास रस्त्यावर दहशत माजवुन खुनी हल्ला करणा-या आरोपींना कोतवाली पोलीसांनी केले काही तासातच जेरबंद

दि.०८/०९/२०२४ रोजी कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर गु.र.नं ९९३/२०२४ भारतीय न्यास सहिंता २०२३ चे कलम १०९,४९,११८(२),११५७२), ३५१ (२) (३),३५२.३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील फिर्यादी नामे प्रतीक विलास चहाण रा. वडगाव गुप्ता, ता.जि. अहमदनगर यास पैशाचे कारणावरुन केडगाव बायपास टोलनाका येथे फिर्यादी यांचे चहाचे टपरीवर येवुन आरोपीने फिर्यादीस तु सारखेच माझे वडीलांकडे पैसे का मागतो असे म्हणाला असता, फिर्यादी त्यांस म्हणाले की, माझे पैसे देवुन टाका व माझा हिशोब क्लिअर करा असे म्हणाला असता त्याचा राग आल्याने उर्वरीत आरोपींने फिर्यादीस लाकडी दांडके, दगड व प्लॅस्टीकची खुर्चीने जिवे ठार मारण्याचे उददेशाने मारहाण केली. सदर गुन्हयाची माहीती भेटताच सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस निरीक्षक प्रताप दारोडे सो यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना आरोपींचा शोध घेणेकामी सुचना देवुन रवाना केल्यानंतर अवघ्या काही तासांतच गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्हयातील आरोपी यांचा नगर शहरातील विविध उपनगरात शोध घेवुन आरोपीत नामे १) संदिप बाळासाहेब थोरात वय- ४२ वर्षे रा. साईनगर, भारत बेकरी मागे बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर २) कार्तीक संदिप थोरात वय १८ वर्षे रा. साईनगर, भारत बेकरी मागे बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर ३) रोहित संतोष चाबुकस्वार वय २१ वर्षे रा. ओम स्वीट पाठीमागे भिंगारदिवे मळा, गुलमोहर रोड सावेडी अहमदनगर यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांना पुढील तपास करीता कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेवुन आले आहे पुढील तपास सपोनि विकास काळे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि / विकास काळे, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार ए. पी. इनामदार, दिपक रोहकले, तानाजी पवार, सत्यम शिंदे, नकुल टिपरे, मोहन भेटे, सुजय हिवाळे, सुरज कदम, संकेत धिवर, अनुप झाडबुके, राम हंडाळ, यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles