Tuesday, February 27, 2024

अहमदनगरमध्ये कोयता गॅंग, तोफखाना पोलिसांची तिघांवर कारवाई

अहमदनगर-मकरसंक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सावेडी उपनगरात गॅंग कोयता घेऊन फिरत होती. तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्वरित कारवाई करत त्या गॅंगला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कोयते व दुचाकी असा २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अमोल गोपीनाथ गायकवाड (वय २६ रा. गऊखेल ता. आष्टी जि. बीड, हल्ली रा. तपोवन रस्ता, सावेडी), रोहीत रमेश औटे (वय २० रा. पिंपरखेड ता. आष्टी जि. बीड, हल्ली रा. पोखर्डी ता. नगर), विकास सदाशिव दिवटे (रा. गाडेकर चौक, निर्मलनगर, सावेडी) अशी गँगमधील पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी सपकाळ चौक, हॉटेल मातोश्री समोर ही कारवाई केली.

पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, संदीप धामणे, सतीष भवर, बाळासाहेब भापसे यांचे पथक तोफखाना हद्दीत मकरसंक्रांतीच्या अनुषंगाने गस्त घालत होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles