Sunday, July 14, 2024

कुस्तीचा असा डाव कधीच पाहिला नसेल; अवघ्या ४० सेकंदात धोबीपछाड,जंगी कुस्तीचा Video

कुस्ती खेळाडू म्हटलं कि आपल्याला खाशाबा जाधव यांचे नाव आठवतं. होय खाशाबा म्हणजे १९५२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळविणारे पहिले भारतीय कुस्ती मल्ल दारा सिंह हे देखील कुस्तीतील एक नामांकित पैलवान. महाराष्ट्रातील गावाकडचे खेळ म्हटले की कबड्डी, खो-खो, लगोरी असे खेळ समोर येतात. परंतु असाच एक गावाकडील खेळ जो साता समुद्रापलीकडे देखील खेळला जातो, तो म्हणजे कुस्ती.कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता , निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डावपेच असतात . उदाहरणार्थ, कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी. हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. दरम्यान सध्या एक कुस्तीच्या आखाड्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका पैलवानानं दुसऱ्या पैलवानाला धोबीपछाड केलंय.

हा सामना इतका थरारक झाला की पैलवान आखाडा सोडून पळून गेला. तुम्हालाही कुस्त्या बघायला आवडत असतील तर हा व्हिडीओ नक्की पाहा..तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहात असाल. मात्र, यातील काही व्हिडिओ असे असतात जे नेटकऱ्यांचं मन जिंकतात आणि चांगलेच चर्चेत येतात. असाच हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
बेळगावातील सांबरा कुस्ती मैदानात ही कुस्ती गाजली असून नेपाळच्या पै.देवा थापाने हिमाचल प्रदेशच्या पै. अमित कुमारला आसमान दाखवले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन्ही पैलवान एकमेकांना हरवण्यासाठी आखाड्यात उतरले. हिमाचल प्रदेशचा पैलवान अमित नेपाळच्या पैलवान देवा याला सुरुवातील मुद्दामून डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी सामना सुरु असून पुढे काय होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. कारण एका पैलवानानं दुसऱ्या पैलवानाला अक्षरश: उलटं, पालटं करुन हरवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला विरोध करण्याएवजी समोरचा पैलवान इतका घबरला की तो आखाडा सोडून पळून लागला. यावेळी कुस्ती पाहण्यासाठी फडावर जमलेली मंडळी त्याला पुन्हा आखाड्यात ढकलण्याचा प्रयत्न करत होते. अखेर नेपाळच्या पै.देवा थापाने हिमाचल प्रदेशच्या पै. अमित कुमारला आसमान दाखवले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles