Tuesday, September 17, 2024

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलाय, पण पैसे आले नाही… शासनाकडून गाईडलाईन जारी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. योजनेसाठी राज्यातील दीड कोटींपेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांच्यांपैकी अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. परंतु अजूनही ही प्रक्रिया सुरु आहे. काही महिलांच्या खात्यांत येत्या काही दिवसांत पैसे जमा होणार आहे. काही महिलांच्या अर्जातील त्रुटी आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही. त्यांनी नेमके काय करावे, यासंदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केल्या आहेत.

महिलांनी या गोष्टींची तपासणी करावी
तुम्ही लाडकी बहीण अ‍ॅप किंवा नारीशक्ती पोर्टलवरुन अर्ज केला आहे. तो मंजूर झाला आहे. परंतु पैसे बँक खात्यात आले नाही. तर आपले बँक खाते आधारकार्डशी लिंक आहे की नाही? हे तपासून पाहा.
बँक खाते आधारकार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा. त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील.
तुमच्या मोबाइलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे. त्यानंतर त्या त्रुटीची पुर्तता करुन अर्ज पुन्हा सबमिट करावा.
आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहावे.
बँक खाते उघडण्यासाठी महिलांनी कोणत्याही एजंटला बळी पडू नये. कोणत्याही बँकेते ५०० किंवा हजार रुपयांसोबत कागदपत्रे दिल्यावर बँक खाते उघडता येते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles