राज्याचे उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्याचं त्यांनी म्हटलं.
रोज सकाळी 10 वाजता मुंबईत घराबाहेर येऊन खोट बोलतात, आज गोबेल्स असता तर त्यानेही आत्महत्या केली असती. जबाबदारीची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे, अदृश्य शक्तींनी पसरवलेल्या चुकीच्या गोष्टी आपणास दूर कराव्या लागतील. विरोधक सरड्यापेक्षा जास्त रंग बदलतात, तुमच्या खोटं बोलण्यामुळे सरडासुद्धा आत्महत्या करेल, असे म्हणत सामंत यांनी लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांच्या टीकेवरुन पलटवार केला आहे. तसेच, राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवलं जाईल, असेही सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे, आता लाडकी बहीण योजना ही निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा आणि प्रचाराचा मुद्दा बनत असल्याचं दिसून येत आहे.