मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. यवतमाळच्या आर्णीत ही योजना वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. बहिणीसाठी सुरु झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका भावाच्या खात्यात जमा झालेत. विशेष म्हणजे, या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली तरीही पैसे जमा झालेत..
या योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता. तरीही त्याच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झालेत. पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्यावर जाफर शेखलाही आश्चर्य वाटलं. अनेक महिलांनी गर्दीत तासन तास उभं राहून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेत. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांची धावपळ सुरु होती.
मात्र आधार लिंक नसल्याच्या कारणाखाली अजूनही अनेक महिलांचे पैसे जमा झालेले नाही. पण जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केलेला नसताना त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याने शासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय. त्यामुळे मोठा गाजावाजा झालेल्या या योजनेची अंमलबजावणीही पारदर्शकपणे व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होतेय.