Sunday, July 21, 2024

मिशन विधानसभा…मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांच्या खात्यात दरमहा रक्कम..हालचाली सुरु

‘लाडली बहना योजना’ . ही योजना मध्य प्रदेश सरकार चालवते. आता याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार देखील गोरगरीब, निम्न, मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्याच्या उद्देशानं एक योजना आखत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी जर ही योजना सुरु केली तर याचा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश सरकार लाडली बहना योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर 1250 रुपये जमा करते. यापेक्षा अधिक रक्कम देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारनं केल्याची माहिती देखील मिळत आहे. ध्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडली बहना योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात 1250 रुपये जमा केले जातात.
या योजनेनंतर मध्य प्रदेशमध्ये भाजपला विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला होता. या योजनेला भाजप सरकारनं पसंती दिली होती.
मध्य प्रदेशात 1 कोटी 29 लाख महिलांना लाडली बन योजनेचा लाभ मिळतो. गेल्या 11 महिन्यांपासून महिलांना हा लाभ दिला जातो. विवाहिता, घटस्फोटीत, विविध भगिनींना या योजनेचा लाभ दिला जातो.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles