Tuesday, April 29, 2025

सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावं, मार्चचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी सांगितली तारीख

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत लाभार्थी महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास चार महिने होऊन गेले पण अद्यापही लाभार्थी महिलांना २१०० रुपये देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे वाढीव अनुदान कधी मिळणार? याकडे लाडकी बहि‍णींचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आता लाडक्या बहि‍णींच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये लाभार्थी महिलांना मिळण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली आहे. ७ मार्च २०२५ पासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून १२ मार्च २०२५ पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचंही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. मात्र, फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये आणि मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यांत जमा होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे की, “लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया ७ मार्च २०२५ पासून सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये व मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यात एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावं”, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles