महाराष्ट्र सरकराने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे.या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेत ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांचा फॉर्म मंजूर झाला की रद्द झाला हे तुम्ही सोप्या पद्धतीने चेक करु शकणार आहात.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत तूम्ही जर योजनेच्या पात्रतेत बसत नसाल तर तुमचा अर्ज मंजूर केला जात नाही. त्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे. तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकीची माहिती भरल्यासदेखील तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. या योजनेत अर्ज मंजूर झाला की रद्द झाला हे कसं चेक कराल ते जाणून घ्या.
तुम्ही नारीशक्ती दूत अॅपवरुन फॉर्म भरु शकतात.या अॅपवर तांत्रिक अडचणी येत असल्याने नवीन वेबसाइट सुरु करण्यात आली आहे. या वेबसाइटवर जाऊन तुम्ही काही मिनिटांतच फॉर्म भरु शकतात.या फॉर्मचा स्टेट्स चेक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
सर्वप्रथम तुम्हाला नारीशक्ती दूत अॅप ओपन करावा लागेल.त्यानंतर महिलेचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
यानंतर तुम्ही तुमचे अकाउंट लॉग इन करा. अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. त्यानंतर ओटीपी वेरिफाय करावा.
लॉग इन केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज असा पर्याय येईल. त्यावर क्लिक करुन तुम्ही अर्जाचा स्टेट्स पाहू शकतात.
यानंतर अर्जाव क्लिक करायचे. अर्ज ओपन झाल्यावर तुम्हाला चार पर्याय पाहायला मिळतील. त्यात Verification done , IN pending To submit, Edit Form असे पर्याय दिले जातील.
जर IN pending To submit दाखवत असेल तर तुम्ही अर्ज भरला आहे परंतु तो पुनरावलोकनासाठी सबमिट केलेला नाही.
Approved असे दिसत असेल तर तुमचा अर्ज स्विकारला गेला आहे.
In Review असे दिसत असेल तर तुमच्या फॉर्मचे मुल्यांकन केले जात आहे.
Rejected असे दिसत असेल तर तुमचे अर्ज स्वीकारले गेलेले नाही.
Disapprove- Can Edi And Resubmit असे दिसत असल्यास तुमचे फॉर्म काही कारणांनी स्विकारले गेलेले नाही.त्यामुळे पुन्हा एकदा सबमिट करा.