Saturday, January 25, 2025

लाडकी बहीण योजना ‘या’ तारखेला महिलांना मिळणार २१०० रुपये; आदिती तटकरेंनी दिली माहिती

माजी मंत्री आदिती तटकरेंनी आता २१०० रुपये कधीपासून येणार हे स्पष्टच सांगितलं आहे. आदिती तटकरेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, वाढीव निधी हा लाडक्या बहि‍णींना येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे मार्च २०२५ पर्यंत येईल. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.लाडकी बहीण योजना बंद होणार, २१०० रुपये महिलांना मिळणार नाहीत अशा अनेक चर्चा सुरु होत्या. अशातच आदिती तटकरे यांनी महिलांना २१०० रुपये कधीपासून येणार हे सांगितले आहे.लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वाढीव निधी लवकरच मिळेल, याबाबतच निर्णय २०२५ च्या अर्थसंकल्पात घेतला जाईल, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महिलांना २१०० रुपये मिळण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहावी लागणारी आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. या योजनेत ज्या महिलांनी खोटी माहिती भरली आहे त्यांना पैसे येणार नाहीत. ही अर्जाची पडताळणी लवकरच सुरु केली जाणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता महिलांना लवकरच मिळणार आहे, असं सांगण्यात येत आहे.

Related Articles

3 COMMENTS

  1. Kasle paise naka vat pahu mahilanno yanna yanchi satta havi hoti mhanun ha sagla khel rachla hota atta kay yanchi satta pan ale shapath vidhi pan zala yanna je hav hot te zal aatta he yojana band zale as samja naka jast asha lau

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles