विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार अर्जदारांना योजनेचा लाभ झाल्याची महिला बालकल्याण विभागाची माहिती आहे. योजनेसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाख ११ हजार ३६३ मंजूर करण्यात आले होते. बाकी अर्जाची छाननी बाकी होती. अजूनही १२ हजार अर्जाची छाननी बाकी आहे.
आत्तापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत, तर ५ हजार ८१४ अर्जामध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. पुणे शहरात ६ लाख ८२ हजार ५५ आले. त्यातील ६ लाख ६७ हजार ४० अर्ज मंजूर झाले. तर ३ हजार ४९४ अर्ज अपात्र ठरले आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त हवेली तालुक्यात सर्वात जास्त अर्ज आले.
४ लाख १९ हजार ८५९ अर्ज आले तर त्यातील ४ लाख १५ हजार ५१० अर्ज मंजूर करण्यात आले. यातील १ हजार १६६ अर्ज अपात्र ठरले आहे. जिल्ह्यात एकूण २१ लाख ११ हजार ९४६ अर्ज आले त्यातील २० लाख ८४ हजार ३६४ अर्ज मंजूर झाले. तर ९ हजार ८१४ अर्ज अपात्र ठरले.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात समाजमाध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यपद्धतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेची सद्यः स्थिती निदर्शनास आणून देण्याच्या सूचना महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.