महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. एकीकडे या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असतानाच काही गैरप्रकार होत असल्याचेही उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वीच साताऱ्यामधील एकाच व्यक्तीने या योजनेचे तब्बल ३० अर्ज करुन मोठा घोटाळा केल्याचे समोर आले होते.
अशातच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले आहे. कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्या १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले आहे. कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्या १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल आहे. या धक्कादायक प्रकाराने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
१२ भावांनी भरले अर्ज…
तसेच जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी असे अर्ज केल्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. त्याची सखोल चौकशी सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत ९२ हजार ९८ अर्ज भरण्यात आले आहेत. त्या अर्जाची ३० ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर भलताच प्रकार समोर आला आहे.
ज्यामध्ये १२ भावांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले. या तरुणांनी आधार कार्डही स्वतःच्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वतःच्याच नावाने भरून दिला, फक्त पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साताऱ्यातील एका तरुणानेही पत्नीच्या नावाने तब्बल ३० अर्ज भरल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे आता या योजनेच्या अंमलबजवाणीदरम्यान होणारे गैरप्रकार लक्षात घेता राज्य सरकारने कडक नियम करण्याची मागणी केली जात आहे