डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींच्या संख्येत वाढ, लाभार्थींच्या खात्यावर ९००० रुपये जमा

0
56

महायुती सरकारने लाडक्या बहिणींचा यावर्षीचा शेवट गोड केला. राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे पैसे जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची संख्या डिसेंबरमध्ये वाढली आहे. डिसेंबरमध्ये २.४६ कोटी लाडक्या बहिणींना ३,६८९ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. लाभार्थींच्या संख्येमध्ये १२ लाखांची वाढ झाली आहे.

आधारकार्ड सिडिंग नसलेले १२ लाख अर्ज डिसेंबरमध्ये मंजुर करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे यावेळी लाडक्या बहिणींची संख्या वाढली. जुलैपासून लागू करण्यात आलेल्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत २१,६०० कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.महत्वाचे म्हणजे, महायुती सरकारने लाडक्या बहिणींचा यावर्षीचा शेवट गोड केला. राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहाव्या हफ्त्याचे पैसे जमा झाले. सहाव्या हफ्त्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारपर्यंत ३,६८९ कोटी रुपये दिले आहेत. आतापर्यंत २.४६ कोटी लाडक्या बहिणींना सहावा हफ्ता मिळाला आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

डिसेंबर महिन्यामध्ये २.४६ कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले. त्यामध्ये १२ लाख नवीन लाभार्थी महिलांचा समावेश आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या संख्येत वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी नोव्हेंबरपर्यंत राज्यातील २.३४ कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या.