अकोल्यात सिमेंटचे लसूण सापडले आहेत. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.होय, काही विक्रेते चक्क सिमेंटचा लसूण विकत आहेत. या लसणाचे व्हिडीओ व्हायरल होत असून राज्यभरात यावर संताप व्यक्त केला जात आहे.
या लसणीच्या पाकळ्याही वेगळ्या होत नव्हत्या. जेव्हा त्याने नीट पाहिला तेव्हा लक्षात आलं तो संपूर्ण लसूण सिमेंटचा आहे. तेव्हा ग्राहकाच्या पायाखालची जमीन सरकली. जर तुम्ही बाजारातून लसूण विकत घेऊन घरी आणत असाल तर काळजी घ्या. हा लसूण तुमच्या जेवणाची चव वाढवणार नाही, पण तोंडात येताच तुमचे दात नक्कीच तुटतील.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिमेंटचा आणि खरा लसूण अगदी सारखाच दिसत आहे. त्यामुळे बाजारात अशाप्रकारे तुमचीही फसवणूक होऊ शकते.