Monday, April 22, 2024

माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप!

लखनभैया एन्काऊंटर केस प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यात सरेंडर होण्याचे आदेश दिले आहेत.

कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याचा 2006 मध्ये बनावट एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर होता. याच प्रकरणी न्यालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 8 नोव्हेंबर 2023 रोजी सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता. जो आज जाहीर करण्यात आला असून शर्मा यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. याप्रकरणी 16 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles