Monday, March 4, 2024

ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर

दिल्ली : देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताना मला आनंद होत आहे. भारतरत्न पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन. देशाच्या विकासात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक, भारताच्या विकासात त्यांचे योगदान बहुमोल आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून त्यांनी देशसेवा केली. देशाचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles