राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय काशीद तालुका कार्यकारणीसह भाजपमध्ये प्रवेश मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला
राळेभात व काशिद यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादीला शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा राजकीय धक्का देणारा ठरणार आहे. या दोन्ही नेत्यांची मतदारसंघात मोठी राजकीय ताकद आहे. प्रा. राळेभात यांनी २५ ऑगस्टला पक्षाचा राजीनामा दिला होता. आमदार प्रा. राम शिंदे यांनी त्यांना भाजपत यावे, अशी खुली ऑफर दिली होती.