राष्ट्रवादी सोबत भाजपाने युती का केली हेच कळायला मार्ग नाही असं वक्तव्य लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलं. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपचं वाटोळं झालंय असं कार्यकर्त्यांना वाटतंय असंही ते म्हणाले.
राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत भाजपने कशासाठी युती केली हेच कळायला मार्ग नाही. इतकी भानगड झाली आहे की आता कार्यकर्त्यांना वाटतंय की राष्ट्रवादीला युतीमध्ये घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा चांगलं झालं नाही, लय वाटोळं झालंय अशी प्रतिक्रिया भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी दिली.