लातूर: लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये निसटता पराभव पत्करावा लागल्यानंतर पंकजा मुंडे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या वेळी तुम्हाला पाच वर्षे वाट पाहावी लागली. पण आता केवळ तीनच महिने शिल्लक राहिले आहेत, असं मुंडे त्यांच्या समर्थकांशी संवाद साधताना लातूरमध्ये म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीत अतिशय कमी मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव झाला. तेव्हापासून त्यांचे समर्थक पंकजा यांच्या पुनर्वसनाची मागणी करत आहेत.
आता पाच वर्षे वाट पहावी लागणार नाही…पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची चर्चा
- Advertisement -