Thursday, September 19, 2024

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरोधात मनसेचा शिलेदार लढणार, राज ठाकरेंनी जाहीर केली उमेदवारी

मराठवाडा दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लातूरमध्ये तिसरा विधानसभा उमेदवार जाहीर केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. नवनिर्माण यात्रे दरम्यान राज ठाकरे यांनी जाहीर केले.लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख हे विद्यमान आमदार आहेत. त्यांना महाविकास आघाडीकडून पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यामुळे लातूर ग्रामीणमध्येही मनसे विरुद्ध महायुती विरुद्ध मविआ असा तिरंगी चुरशीचा सामना होणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles