Thursday, September 19, 2024

महाराष्ट्रात विधानसभा थेट डिसेंबर मध्ये, नोव्हेंबरअखेर राष्ट्रपती राजवट?

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. परंतु महाराष्ट्रात मात्र तूर्तास निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका या नोव्हेंबर मध्ये होतील असे म्हटले जात होते.

२६ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत असल्याने निवडणुका या नोव्हेंबरमध्ये होतील असे म्हटले जात होते.परंतु आता सूत्रांच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या डिसेंबर मध्ये होतील असे म्हटले जाऊ लागले आहे. डिसेंबर महिण्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होतील असे म्हटले जात आहे. याचे कारणही समोर आले आहे.लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. महिला मतदार आकृष्ट करण्यासाठी मोठी खेळी या योजनेतून केली जात आहे. परंतु सध्या महिलांना पैसे मिळण्यात येणाऱ्या अडचणी पाहता हे पैसे मिळायला उशीर होत आहे.

त्यामुळे जर निवडणुका नोव्हेंबर मध्ये घेतल्या व आचार संहिता लागली तर अनेक महिलांचे पैसे हे आचारसंहितेमुळे येणार नाहीत. याचा मोठा फटका बसू शकतो त्यामुळे निवडणुका या डिसेंबर मध्ये घेण्यात याव्यात यासाठी हे सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहे.

राष्ट्रपती राजवट लागेल काय?
२६ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत असल्याने व निवडणुका जर डिसेंबर मध्ये गेल्या तर मात्र संविधानातील तरतुदीनुसार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रात हरियाणा व जम्मूकाश्मीरसोबतच निवडणुका का नाहीत?
महाराष्ट्रात निवडणुका न घेण्याचे महत्वाचे कारण आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहे. त्यांनी म्हटलंय की, जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानतंर प्रथमच निवडणुका पार पडतायेत. तेथे सध्या मागील काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.

निवडणुकीच्या काळात सर्व उमेदवारांना कडेकोट सुरक्षा त्याठिकाणी पुरवावी लागणार आहे. त्यामुळे या काळात महाराष्ट्रात निवडणुका होणार नसल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles