केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंबधी काय माहिती देणार?विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा
“राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम वेगवेगळ्या विभागांमधील जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेणार आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नाशिक, पुणे, कोकण, मुंबई शहर आणि उपनगरचा दिवसभर आढावा घेणार आहेत. दूरदृश्यप्रणालीद्वारे हा आढावा घेतला जाणार आहे”
“बोगस मतदारांच्या तक्रारींचा आढावा-
लोकसभा निवडणुकीला मतदार याद्यांबाबत अनेक तक्रारी झाल्यात. मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार घुसवण्यात आल्याच्या या तक्रारी आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी या तक्रारी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत निवडणूक आयोगाकडे केल्यात. या तक्रारी पुराव्यानिशी आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी याचा देखील आढावा घेणार असल्याचे सांगितलं जात आहे.”
“ईव्हीएम’ मशीन तपासणी-
राज्यात एक लाखांपेक्षा अधिक मतदान केंद्र असणार आहेत. मतदानासाठी ईव्हीएम वापरल्या जातील. त्यांची तांत्रिक तपासणी आणि त्या मतदानासाठी योग्य असल्याची खात्री तज्ज्ञ अभियंत्यांकडून करून घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित होते. त्याचा आढावा देखील मुख्य अधिकारी घेतील.”
“राज्यातील जिल्हानिहाय विधानसभा मतदारसंघनिहाय हा आढावा असणार आहे. ईव्हीएम मशीन, मतदान कर्मचारी, कायदा आणि सुव्यवस्था, मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्र, बूथ केंद्राचा प्रस्ताव, मतदार यादी, नियंत्रण कक्ष, माध्यम कक्ष, नोडल अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, तक्रार निवारण, निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेले ‘अॅप’ची स्थिती, वाहतूक व्यवस्था, टपाल मतदान प्रक्रिया आदींचा आढावा यात घेतला जाणार आहे.”