बिबट्या हा अत्यंत खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. गर्द झाडी असो वा गडद अंधार बिबट्या अगदी सराईतपणे शिकार करतो.
सिंह, वाघ, बिबट्या व चित्ता हे सगळे जंगलातील भयानक शिकारी मानले जातात. त्यापैकी बिबट्या हा प्रत्येकापेक्षा वेगळा आहे. कारण- तो शिकार करण्याचं काम कधी आणि कसं करतो हे कोणाला समजतही नाही. त्याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यामध्ये बिबट्याने हरणाची अचानक झेप घेत शिकार केली. तुम्ही काही व्हिडीओंमध्ये पाहिले असेल की, एखाद्या प्राण्याची शिकार केल्यानंतर बिबट्या त्याला आपल्या जबड्यात घट्ट धरून ठेवतो आणि नंतर त्याच्यासह झाडाच्या काही उंचीवर चढून जातो. पण, तुम्ही कधी असा व्हिडीओ पाहिला आहे का; ज्यामध्ये बिबट्या झाडाच्या माथ्यावरून आपल्या शिकारीवर उडी घेतो आहे? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.जंगलात जिवंत राहायचं असेल, तर सतत पळावं लागतं. मग तो वाघ असो वा ससा, कोणी शिकार करण्यासाठी पळतं; तर कोणी शिकार होऊ नये म्हणून… पण जो थांबतो, त्याचं काय होतं ते तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. तर त्याचं झालं असं की, एका हरणावर बिबट्यानं हल्ला केला.