वाघ, सिंह, बिबट्या हे जंगलाचे राजे आहेत. त्याच्याशी तुलना करता येईल असा कोणताही प्राणी नाही. या प्राण्यांना सर्वात धोकादायक शिकारी देखील म्हटलं जातं. जर त्याने एखाद्याची शिकार करण्याचा निर्णय घेतला तर तो क्वचितच मागे हटतो. त्याचे पंजे इतके मजबूत असतात की ते सर्वात मोठी शिकारही सहज पकडू शकतात. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं.
चपळाई आणि हल्ल्याचं तंत्र या बाबतीत वाघालाही मात देईल असा प्राणी म्हणजे बिबट्या. बिबट्याचा तुफान वेग आणि विलक्षण चपळाई भल्याभल्या शक्तिशाली प्राण्यांनाही हार पत्करायला लावू शकते. त्यामुळे बिबट्यानं शिकारीसाठी चाल केली, की समोरच्या प्राण्याचा खेळ खलास झालाच म्हणून समजयाचं! अशाच एका हरणाची बिबट्यानं ७ सेकंदात शिकार केली.