जवखेडे खालसा गावामध्ये बिबटयाची प्रचंड दहशत आहे गेल्या १५ दिवसात अनेक शेतकऱ्यांनी बिबटया बघितला आहे , सध्या बहुतेक शेतकऱ्यांचे कापुस वेचनीचे काम चालू आहे काल रात्री व आज दुपारी सुद्धा शेतात बिबटयाचे दर्शन झाले त्यामुळे आज तिसगाव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अनिल शेलार यांना जवखेडे खालसा परीसरात गस्त वाढून ज्या ठिकाणी बिबटयाचा जास्त वावर आहे तेथे पिंजरा लावण्याबाबतचे निवेदन देताना जवखेडे खालसाचे सरपंच चारूदत्त वाघ, अँड. वैभव आंधळे, पोपटराव कराळे , माणिक कराळे, नवनाथ आरोळे आदी…
श्री शेलार साहेब यांनी तातडीने जवखेडे खालसा परीसरात गस्त वाढविण्याचे व पिंजरा लावण्याचे आदेश क्नरक्षक आरती ढाकणे, वनपाल श्री शर्माळे, वनमजुर विष्णु मरकड, चालक गणेश पाखरे यांना दिल्या, आज दुपारी ज्या ठिकाणी बिबटया चा वावर आहे तेथिल ठसे पाहुन गेले.
जवखेडे खालसा परीसरात वनविभागाची गस्त रात्री पण राहील.
जवखेडे खालसा गावामध्ये १५ दिवसात बिबटयाची दहशत
- Advertisement -