Monday, June 17, 2024

अहमदनगर राहुरी वरवंडी परिसरात बिबट्या पिंजऱ्यायात अडकला

वरवंडी परिसरात बिबट्या पिंजऱ्यायात अडकला

राहुरी : वरवंडी येथील वेदिका श्रीकांत ढगे या चिमुरडीचा बिबट्याने बळी घेतल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सिमेन स्टेशन हद्दीत लावलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट रविवारी सकाळी अडकला. या भागात अद्यापही दाेन बिबट्यांचा वावर असून, परिसरात भीती कायम आहे.

राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे दि. २३ राेजी बिबट्याने सकाळीच आई-वडिलांसमवेत भुईमुगाचा पाला घेऊन घराकडे निघालेल्या चिमुरडीला गिन्नी गवतात ओढले. चिमुरडीच्या गळ्याला झालेल्या जखमेतून रक्तस्राव झाल्याने वेदिका ढगे हिचा मृत्यू झाला. आई मनीषा ढगे व वडील श्रीकांत ढगे यांच्या डोळ्यांसमोर घडलेल्या या घटनेमुळे परिसरातीत नागरिकांत दहशत पसरली आहे. मानवी वस्त्यांकडे आगेकूच करीत हल्ला करणारा बिबट्या पुन्हा हल्ला करण्याची शक्यता पाहता, वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी व्यूहरचना आखली होती. ड्रोन कॅमेऱ्याने बिबट्याचे वास्तव्य व शिकारीचा मार्ग पाहता, घटना स्थळालगतच चार ठिकाणी पिंजरे लावले होते. दोन पिंजऱ्यांत शेळ्या, तर दोन पिंजऱ्यांत कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या.

वन क्षेत्रपाल युवराज पाचारणे, वनरक्षक पवन निकम, राजेंद्र रायकर, सतीश जाधव, जी. टी. मोरे, पोपट शिंदे, विलास तमनर, महादेव शेळके आदींचे पथक परिसरात तैनात होते. संबंधित बिबट्या हा मादी असून, तो अडीच वर्षे वयाचा असल्याचे वनक्षेत्रपाल पाचारणे यांनी सांगितले. पकडलेल्या बिबट्याला डिग्रस नर्सरीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीसाठी ठेवण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles