एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी प्राण्यांच्या भांडणांच्या व्हिडिओला चांगलीच पसंती देताना दिसतात.
सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याला संपूर्ण जंगलात कोणीही आव्हान देऊ शकत नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका रेड्याने धाडसाने रणांगणाचा खेळच पूर्णपणे बदलून टाकला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण थक्क होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक रेडा थेट सिंहाला भिडल्याचं दिसत आहे.व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक सिंह दोन रेड्यांच्या मागे त्यांना मारण्यासाठी धावत आहे. दोन्ही रेडे आपला जीव वाचवण्यासाठी वेगाने धावतात, त्या दरम्यान त्यांच्यापैकी एक मोठ्या धाडसान मागे वळतो आणि थेट जंगलाच्या राजालाच भिडतो. रेड्याची हिंमत पाहून सिंहाची मात्र दाणादाण उडताना दिसत आहे. रेड्याची हिंमत पाहून सिंहही घाबरतो. ते पाहून त्याची प्रकृती बिघडल्याचं स्पष्ट होतंय. अखेर जंगलाचा राजा सिंह या लढाईत माघार घेताना दिसत आहे.
Life begins when fear ends … pic.twitter.com/471NIj97Bj
— The Best (@ThebestFigen) March 9, 2024