व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शिव तांडव स्तोत्राचे पठण करणाऱ्या एका लहान मुलाचा आत्मविश्वास खरोखरच पाहण्यासारखा आहे. व्हिडीओमध्ये एक लहान मूल एका दमात मोठ्या आत्मविश्वासाने शिव तांडव स्तोत्राचे पठण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून त्याला खूप पसंती दिली जात आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक लहान मूल शेतात उभे असल्याचे दिसत आहे, ते पाहून त्याचे वय ५ते ६ वर्षे असावे असा अंदाज बांधला जाऊ शकतो. व्हिडीओमध्ये बनियान आणि शॉर्ट्समध्ये दिसणाऱ्या मुलाचे नाव शिवांश असल्याचे समजते. इंस्टाग्रामवर शिवांश प्रजापती नावानच्या अंकाऊवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
- Advertisement -