कोपरगावची गौरी पगारे ठरली सारेगम लिटिल चॅम्पची महाविजेती…

0
39

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’२०२३ चा महाअंतिम सोहळा काल मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला खास पाहुणे म्हणून लोकप्रिय गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, छोटा पॅकेट मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे हे ‘लिटील चॅम्प्स टॉप ६’ मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगावच्या गौरी अलका पगारेने बाजी मारत विजेती होण्याचा मान पटकावला. गौरीला पारितोषिक म्हणून गौरीला १,५०,००० चा धनादेश आणि चांदीची वीणा देण्यात आली. तर उपविजेत्या ठरलेल्या श्रावणी वागळे आणि जयेश खरेला प्रत्येकी १,००,००० चा धनादेश देण्यात आला.