Wednesday, November 13, 2024

शेवगाव तालुक्यात हॉटेल राजयोगमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, दोन पिडीतांची सुटका

हॉटेल राजयोग, शेवगाव येथील कुंटणखान्यावर पिटा कायदयांतर्गत कारवाई
स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई

मा.श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/ तुषार धाकराव पोलीस अंमलदार संदीप दरंदले, संतोष खैरे, विशाल तनपुरे, ज्योती शिंदे तसेच रणजीत जाधव नेम. तपास पथक अहमदनगर यांचे पथक तयार करुन त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.

तपास पथक दिनांक 19/10/2024 रोजी शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोसई/तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारा मार्फत हॉटेल राजयोग, शेवगाव ते गेवराई जाणारे रोडवर, शेवगाव येथे एक इसम महिलाकरवी कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवित आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाने सदरची माहिती पोनि/समाधान नागरे नेम.शेवगाव पोलीस स्टेशन यांना दिली.त्यानंतर तपास पथक व पोनि/समाधान नागरे व पोलीस अंमलदार प्रियंका शिरसाठ, किशोर पालवे, नेम.शेवगाव पोलीस स्टेशन अशांच्या संयुक्त पथक तयार करून छापा कारवाई करणेबाबत रवाना झाले.

तपास पथकाने हॉटेल राजयोग, शेवगाव येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता पथकातील पोलीस अंमलदार बनावट ग्राहक म्हणुन पाठविले.तपास पथकाने नमूद हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर शासकीय पंचासमक्ष हॉटेलवर छापा टाकुन हॉटेलमधील इसम नामे अमर मारूती ढाकणे, वय 24, रा.हसनापूर, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन 20,000/- रूपये किंमतीचा एक मोबाईल व 1,000/- रूपये रोख रक्कम असा एकुण 21,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. अमर मारूती ढाकणे याचेसह हॉटेलची पाहणी करता हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये 2 महिला मिळून आल्या.नमूद महिलाकडे विचारपुस करता त्यांनी आम्हास वेश्या व्यवसाय करून ग्राहकाकडून पैस घेऊन, त्यामधुन आम्हास पैस देतात व आमचेकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आमची उपजीविका चालते, अशी माहिती सांगीतली.नमूद पथकाने वर नमूद महिलांची सुटका केलेली आहे.

तपास पथकाने दिनांक 19/10/2024 रोजी 15.25 वा. सुमारास हॉटेल राजयोग, शेवगाव येथे छापा टाकुन केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नामे 1) अमर मारूती ढाकणे, वय 24, रा.हसनापूर, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर व हॉटेल मालक 2) बाबासाहेब अंधारे (पुर्ण नाव माहित नाही), रा.शेवगाव, ता.शेवगाव हे स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता 2 महिलांकडून कुंटणखाना चालवून त्यावर आपली उपजिवीका करताना मिळून आलेले आहे.

आरोपी नामे 1) अमर मारूती ढाकणे, वय 24, रा.हसनापूर, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर व हॉटेल मालक 2) बाबासाहेब अंधारे (पुर्ण नाव माहित नाही), रा.शेवगाव, ता.शेवगाव यांचेविरूध्द मपोकॉ/1663 ज्योती शिवाजी शिंदे, नेम.स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं 844/2024 स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles