Tuesday, April 23, 2024

Video : चिमुकल्याला सलाम! वेळ साधली अन् बिबट्याला खोलीत कोंडले, नाशिकचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर अनेक अचंबित करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका चिमुकला एका बिबट्याला चक्क खोलीत जेरबंद करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
अलीकडे मानवी वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे. मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याचे अनेक प्रकरणे तुम्ही वाचली असेल. या व्हिडीओमध्ये सुद्धा अशाच एका बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याचे दिसतेय. पुढे या बिबट्याबरोबर जे काही घडते, ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दरवाजाच्या शेजारी सोफ्यावर बसून मोबाईवर गेम खेळताना दिसत आहे. अचानक दरवाज्यातून बिबट्या आत शिरतो आणि थेट आतमध्ये जातो. चिमुकल्याला हे लक्षात येते तेव्हा तो वेळ न घालवता खोलीचा दरवाजा लावून बिबट्याला घरात जेरबंद करताना दिसतो. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. चिमुकल्याने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला जेरबंद केले. सध्या या चिमुकल्याचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.हा व्हायरल व्हिडीओ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles