लोकसभा निवडणुक २०२४ चे कालावधीमध्ये उमेदवारांचे प्रचारा दरम्यान सोशल मिडिया व्दारे बदनामी करणे, अफवा पसरविणे व्देषपूर्ण संदेश, खोटे संदेश तसेच प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडिया व्दारे प्रसारित होणाऱ्या फेक न्यूज प्रसारीत करणे कायदयाने गुन्हा असुन अशा प्रकारचे संदेश व अफवा पसरवुन दोन समाजात / गटात तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर यांचेकडुन सोशल मिडिया वर बाँच राहणार असुन अफवा पसरविणारे विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
लोकसभा निवडणुक २०२४ हि शांततेत पार पाडण्यासाठी अहमनगर जिल्हा पोलीस दलाकडुनसर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि,अशा प्रकारे सोशल मिडिया व्दारे बदनामी करणे, अफवा पसरविणे, व्देषपूर्ण संदेश, खोटे संदेश तसेच प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडिया व्दारे प्रसारित होणान्या फेक न्युज संदर्भात तक्रार देण्याकरिता अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडुन १९५६४३८०८८ हा मोबाईल क्रमांक प्रसारीत करण्यात येत असून सदरच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉटसअॅप सुविधा सुध्दा उपलब्ध आहे तरी नागरिकांनी आपल्या वरिल तक्रारी नमुद मोबाईल क्रमांक यावर कराव्यात, प्राप्त तक्रारीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.