लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज (१ जून) मतदान होणार आहे. यानंतर सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान संपेल. सर्व 543 जागांचे निकाल 4 जून रोजी जाहीर होतील. आज सातव्या टप्प्यातील मतदानानंतर वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल दाखवले जातील. यातच एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाने पुन्हा आपल्या जुन्या सूचनांचा पुनरुच्चार केला आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान संपल्यानंतर किमान अर्ध्या तासापर्यंत कोणताही एक्झिट पोल प्रसिद्ध करू नये, असे निवडणूक आयोगाने शुक्रवारी सांगितले. आहे.म्हणजे मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोल दाखवला जाणार नाही. याआधी काँग्रेसने विविध टीव्ही चॅनेल्सवरील एक्झिट पोल संर्दभाती चर्चेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले
काँग्रेसने म्हटले आहे की, त्यांचे नेते लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलशी संबंधित चर्चेत भाग घेणार नाहीत. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मतदारांनी मतदान केले आहे आणि त्यांचा निर्णय सुरक्षित आहे. 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी आम्हाला टीआरपीसाठी सट्टा आणि वादविवाद करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.”