Tuesday, February 18, 2025

19 एप्रिलला मतदान आणि 22 मे रोजी निकाल? लोकसभा निवडणुकीसंदर्भातील पत्र व्हायरल

आगामी लोकसभा निवडणुकीचे मतदान एप्रिल किंवा मे महिन्यात होऊ शकते, अशी चर्चा आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र हे खरं आहे का? निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत का? काय आहे या व्हायरल पत्रामागचं नेमकं सत्य, हे जाणून घेऊ
व्हॉट्सॲपसह इतर सोशल मीडिया नेटवर्कवर व्हायरल होत असलेल्या या पत्रात 28 मार्चपासून लोकसभा निवडणूक 2024 साठी नामांकन सुरू होईल, असे म्हटले आहे. पत्रानुसार 19 एप्रिलला मतदान होणार आहे. 22 मे रोजी मतमोजणी सुरू होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहेत. त्यानंतर 30 मे रोजी नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा व्हायरल झालेल्या पत्रात करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मात्र हे खरं नाही. हे फेक पत्र आहे. खुद्द निवडणूक आयोगाने याबाबत सत्य सांगितलं आहे. व्हॉट्सॲपवर व्हायरल होणारे हे पत्र फेक असल्याचे निवडणूक आयोगाने ट्विटरवर पोस्ट करत सांगितलं आहे.
व्हायरल पत्राबद्दल पोस्ट करत निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ”लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या वेळापत्रकाबाबत एक फेक पत्र व्हॉट्सॲपवर व्हायरल होत आहे. हा मेसेज फेक आहे. भारतीय निवडणूक आयोगाने अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत. निवडणुकीच्या तारखा जाहीर होईल, त्यावेळी आयोगाकडून पत्रकार परिषद बोलावली जाईल.” त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखांचे व्हायरल झालेले पत्र फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणूक कधी होणार, किती टप्प्यात मतदान होणार? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळतील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles