देशात लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. अनेक पक्षांनी आपल्या निवडणुकीच्या तयारी सुरू केलीय. भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचं सत्र सत्र सुरू झालंय.
त्यातच ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक संदर्भातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या पूर्ण करण्याच्या सुचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने यासंदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवलंय. यामुळे देशात मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम लागू केला जाण्याची शक्यता आहे.
निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ नये यासाठी ३१ जानेवारीपर्यंत सर्व बदल्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. लोकसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे मार्च महिन्याच्या आधीच निवडणुका जाहीर होतात का? या संदर्भात चर्चा सुरू आहे.