संसदेच्या सुक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या ३१ खासदारांना उर्वरित अधिवेनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. त्यात काँग्रेस खासदार, विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह अन्य प्रमुख खासदारांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच लोकसभा अध्यक्षांनी १३ खासदारांना निलंबित केलं होतं.
कोणत्या खासदारांना निलंबित करण्यात आले?
अधीर रंजन चौधरी, के जय कुमार, अपूर्व पोद्दार, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेल्वम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमाथी, के नवस्कानी, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगता रॉय, शताब्दी रॉय, असित कुमार मल, कौशलेंद्र कुमार यांच्याशिवाय , अँटोनी अँटोनी, एसएस पलानामनिकम, अब्दुल खालिद, तिरुवरुस्कर, विजय बसंत, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस राम लिंगम, के सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई आणि टीआर बालू.