Tuesday, June 25, 2024

महाराष्ट्रात महायुतीचे मनसुबे फेल…महाविकास आघाडी वरचढ ठरण्याची शक्यता…

महाराष्ट्रात भाजप्राप्रणित महायुतीने ४५+ जागा जिंकू असा दावा केला होता. मात्र महायुतीत अनेक पक्षांचा भरणा झालेल असूनही महायुतीच्या महाराष्ट्रातील जागा कमी होणार असल्याचा अंदाज टाईम्स नाऊ-ईटीजीच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.

टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला मिळून (महायुती) २६ जागांवर विजय मिळेल. तर काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळून (महाविकास आघाडी) २२ जागांवर विजय मिळेल.

एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार महायुतीला महाराष्ट्रात २५ जागाही मिळणार नाहीत. या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीला २४ आणि महाविकास आघाडीला २३ जागा मिळतील. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो.

रिपब्लिक भारत-मॅट्रीझ
महायुती – ३० ते ३५
मविआ – १३ ते १९

रिपब्लिक PMARQ
महायुती – २९
मविआ – १९

टीव्ही ९ पोलस्ट्राट
महायुती – २२
मविआ – २६

एबीपी-सी व्होटर
महायुती – २४
मविआ – २३

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles