लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारून आंदोलन करणारे दोघं आणि संसदेबाहेर आंदोलन करणारे दोघं एकमेकांना ओळखतात आणि त्यांनी मिळून हा कट रचल्याचा आरोप तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे. या चौघांनाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला एक जण महाराष्ट्राच्या लातूरचा असून त्याचं नाव अमोल शिंदे आहे. अमोल शिंदे याला कायदेशीर मदत करण्यासाठी वकील असीम सरोदे पुढे आले आहेत.
असीम सरोदे यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. ‘संसद भवनात आंदोलन करणं चूकच आहे, मात्र युएपीए कायदा लावणं, हा अतिरेक होईल. आंदोलकांची भूमिका सरकारने समजून घ्यावी. कोणतं नुकसान करणं हा त्यांचा उद्देश नव्हता. आपली बाजू मांडण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता. अजूनपर्यंत त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती पोलिसांनी कुटुंबियांना दिली नाही, त्यांना सगळी कायदेशीर मदत करणार,’ असं असीम सरोदे म्हणाले.
लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या अमोल शिंदेला महाराष्ट्रातील वकील करणार कायदेशीर मदत.,.
- Advertisement -