Monday, July 22, 2024

लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी राहुल गांधी यांचे नाव निश्चित….

लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते के.सी. वेणूगोपाल यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रो-टेम स्पीकर भर्तृहरी महताब यांना पत्र लिहित राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील, अशी माहिती दिल्याचे वेणूगोपाल म्हणाले.यापूर्वी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी हे पद भूषवलं आहे. दरम्यान, ९ जून रोजी झालेल्या काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड करावी, यासंदर्भातील ठराव पारीत करण्यात आला होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles